दापोली तालुक्यातील हातीप गावातील नळपाणी योजनेचे काम सुरू आहे.
काम सुरू असताना त्यातील एका पाईपचे कुऱ्हाड मारून नुकसान करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदय नारायण इंदुलकर असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १५) दुपारी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हातीप येथे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन नळपाणी योजनेचे काम सुरू आहे.
शुक्रवारी दुपारी हातीप गावातील चाळीचा कॉड या भागात उघड्यावर असलेल्या पाणी योजनेचा पाईप उदय नारायण इंदुलकर याने कुऱ्हाडीने तोडून नुकसान केल्याची माहिती सरपंच मिनाक्षी शेडगे यांनी ग्रामसेवक मानसी भांबीड यांना दिली.
या संदर्भात त्यांनी संशयिताकडे विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ करून धमकीही दिली असल्याची माहिती सरपंच यांनी ग्रामसेवक भांबीड यांना दिली.
त्यानंतर त्यांनी जागेवर जावून नुकसान झालेल्या पाईपची पाहणी केली. शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी ग्रामसेवक मानसी भांबीड यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















