निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादीचा संबंधित जागा मालकाच्या परवानगी
शिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत ( दिनांक 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घालत असल्याचा आदेश जिल्हा दंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी
दिनांक 16 मार्च रोजी कार्यक्रम घोषीत केला आहे. निवडणूक
कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता
अंमलात आलेली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची
संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या
दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी
किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने
निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी
फलक लावणे, भितीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे इत्यादीकरिता
कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर
संबंधित मालकाची परवानगी शिवाय व संबंधित परवाना
प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास निर्बंध
घातल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी सिंह यांनी फौजदारी
प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार त्यांना असलेल्या
अधिकाऱ्यांचा वापर करून लागू केले आहेत. प्रत्येक इसमावर हे
आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश
ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी
करावी असेही, आदेशात म्हटले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















