तालुक्यातील सोमेश्वर मुस्लिमवाडी येथे एका मुलाला मारहाण करत त्याच्या घरात घुसून 20 हजार लांबवल्याप्रकरणी दोन अज्ञात महिलांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शुक्रवार 15 मार्च रोजी दुपारी 1 वा.घडली आहे.याबाबत नाजनीन मोहम्मद हनिफ सोलकर (35,रा.सोमेश्वर मुस्लिमवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, शुक्रवारी दुपारी यातील दोन संशयित महिलांनी फिर्यादींचा मुलगा आम्मारच्या कानाखाली, पाठीमध्ये व पोटावरती मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर आम्मारचा पाठलाग करत त्याच्या घरात जात त्याला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना घडत असताना अम्मारची आई पैसे मोजत होती. आम्मारचा आवाज ऐकून ती बाहेर आली असतान दोन्ही संशयित महिलांनी त्यांचे 20 हजार रुपये चोरुन तिथून पळ काढला.
याप्रकरणी दोन्ही महिलांविरोधात भादंवि कायदा कलम 379,452,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















