रत्नागिरी : शहरातील रिक्षाव्यवसायिक व तरुणांचा मनसेत प्रवेश

banner 468x60

राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रत्नागिरी शहरातील रिक्षाव्यवसायिक व काही तरुणांनी रविवारी सायंकाळी साई मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

banner 728x90 banner 728x90

गेल्या काही काळापासून सातत्याने रत्नागिरी शहर मनसे पदाधिकारी रिक्षाचालकांच्या समस्या व मागण्या यांचा पाठपुरावा करत आहेत.

वेळोवेळी मनसे पक्ष व पदाधिकारी रिक्षाचालक बांधवांच्या पाठीशी उभे राहत आले आहेत व इथून पुढेही राहतील हा विश्वास असल्याने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत आहोत असे रिक्षा व्यवसायिक इम्रान नेवरेकर यांनी सांगितल

तसेच रिक्षा व्यावसायिक व तरुणांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर व शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी मनसे तुमचे प्रश्न सोडविण्यास कायम कटिबद्ध असेल असे आश्वस्त केले.

रत्नागिरी शहरातील मार्विक नारकर, प्रवीण चव्हाण, रिक्षाव्यवसायिक इम्रान नेवरेकर, प्रदीप साळुंके, अमोल पाटील, राजू सकपाळ, दिनेश भागवत, रमण पुरी, रईस धामणस्कर, बावा धामणस्कर, वसीम कासु, दिपराज मोकाशी, मुफीद मुल्ला, संदीप राणे, सिकंदर शेख, बशीर खान, अमोल शिंदे, प्रणव साळुंके, आदींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, मनसे परिवहन कामगार सेना राज्य उपाध्यक्ष सुनिल साळवी, शहरसचिव अजिंक्य केसरकर, विभागअध्यक्ष सर्वेश जाधव, मनसे नाविक सेना जिल्हा चिटणीस बिपिन शिंदे, मनसे शेतकरी सेना उपजिल्हाध्यक्ष भाई साळवी,
मनसे शेतकरी सेना तालुका सचिव सतिश खामकर, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष तेजस साळवी, माजी शहर अध्यक्ष अरविंद मालाडकर, निखिल आंब्रे, राजेश शिंदे आदी महाराष्ट्रसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *