Breaking News
गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा

दापोली : मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या गाडीला अपघात, पाच प्रवासी गंभीर

banner 468x60

मुंबई गोवा महामार्गावर पनवेल नजीक शनिवार 4 नोव्हेंबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास झायलो गाडीला अपघात होऊन पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे .

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पहाटे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी कडून मुंबईकडे युसुफ शहाजी हे आपल्या कुटुंबियां समवेत झायलो गाडीने मुंबईकडे प्रवास करताना पहाटे सहाच्या सुमारास पनवेल जवळ अचानक जोरदार आवाज झाला आणि गाडीचा अपघात झाल्याची माहिती युसुफ शहाजी यांनी दिली.

banner 728x90 banner 728x90

सर्वजण झोपेत असल्यामुळे आणि चालकालाही डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र आम्ही सर्वच झोपेत असल्याने गाडी कशावर आदळली हे आम्हाला न समजतात गंभीर दुखापत झाल्याची माहिती गाडीतील प्रवाशांनी दिली.

त्या अपघातात तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. सर्व जखमीना डी .वाय .पाटील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *