रत्नागिरी : मंत्री उदय सामंत यांचा 80 कोटींचा ‘डांबर’घोटाळा समोर ?

banner 468x60

उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संदर्भातील मोठी बातमी समोर आलीय. मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत तब्बल 80 कोटींचा ‘डांबर घोटाळा’ केल्याचे समोर आलंय.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

‘मे. आर.डी. सामंत कन्स्ट्रक्शन प्रा. लि.’ कंपनीच्या माध्यमातून वडील आणि भावाच्या संगनमताने खोटी बिलं बनवून ‘एमआयडीसी’, ‘पीडब्लूडी’ आणि नॅशनल हायवेच्या कामात हा भ्रष्टाचार केला असल्याची माहिती समोर आली आहे, हा प्रकार “माहिती अधिकारातून” समोर आला आहे.

रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. सामंत यांनी काही वर्षांपासून रत्नागिरीतील शासकीय कामांत अनेक कंत्राटे मिळवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप कीर यांनी केलाय.

शासकीय कामे मर्जीतील ठेकेदारांना देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा भ्रष्टाचार सुरू आहे. यासाठी ठरावीक कंत्राटदारांचा ग्रूप तयार करून नव्या कंत्राटदारांना दमदाटी करून दबाव आणला जात आहे आणि मर्जीतील ठेकेदारांना काम देऊन भ्रष्टाचार, दर्जाहीन कामे केली जात असल्याचेही यावेळी कीर यांनी म्हटलं आहे.

मंत्री उदय सामंत आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घोटाळय़ाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करून पुरावे सादर केल्याचे यावेळी कीर यांनी म्हटलंय.

या सर्व प्रकरणांची तातडीने सखोल चौकशी करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा देण्याची मागणी कीर यांनी केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *