दापोली : जमिनीतील झाड तोडण्यावरून सख्या भावांमध्ये मारहाण

banner 468x60

दापोली तालुक्यामधील जालगाव साखळोली येथे क्षुल्लक कारणावरून दोन सख्या भावांमध्ये मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना गुरुवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय शिंदे याने त्याचा भाऊ प्रदीप शिंदे याला सामायिक जमिनीमधील झाडे तोडू नको, असे सांगितले.

banner 728x90

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

हे सांगत असताना प्रदीप शिंदे याने जमिनीच्या कारणावरून मनात राग धरून शिवीगाळ केली. त्याच्या हातात असणारी कोयती विजय शिंदे याला मारण्यासाठी उगारली. या कोयतीची धार विजय शिंदे याने हाताने पकडली.

त्यावेळी विजय शिंदे यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. दोघांच्या झटापटीत कोयती हातातून खाली पडली. त्यानंतर आरोपी प्रदीप शिंदे याने खाली पडलेल्या जंगली झाडाची काठी घेऊन विजय शिंदे याला मारहाण केली.

या मारहाणीत विजय शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आरोपी प्रदीप शिंदे यांच्याविरोधात विजय शिंदे यांनी दापोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी अधिक तपास दापोली पोलिस स्थानकाचे पोलिस हवालदार ए. एस. गायकवाड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *