चिपळूण : व्यवसायातील हिश्श्याच्या वादातून भावावर हल्ला

banner 468x60

व्यवसायात आपला हिस्सा किती, अशी विचारणा करणाऱ्या सख्ख्या भावाला दगड मारून त्याच्या पायावर गंभीर दुखापत केल्याची घटना खांदाट भोईवाडी (ता. चिपळूण) येथे २६ ऑगस्ट रोजी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दिनेश संपत पवार (३५) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

सूरज पवार आणि त्यांचे दिनेश व हेमंत हे दोन भाऊ मिळून डांबर सप्लायर्सचा व्यवसाय करतात. त्यासाठी सूरज पवार यांनी कर्ज काढून तसेच साठवलेली रक्कम मिळून ८० लाख ५ हजार रुपये या व्यवसायासाठी दिले.

त्यानंतर दिनेश याने पत्नी व स्वतःच्या नावे फर्म सुरू केली. सूरज पवार यानी या व्यवसायात आपला हिस्सा किती, अशी सातत्याने विचारणा केली. त्याचा राग येऊन दिनेश याने सूरज पवार यांना मारहाण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *