नीलिमा चव्हाण मृत्यु प्रकरण : संग्राम गायकवाडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

banner 468x60

नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाने संशयित आरोपीला जामीन देण्यास नकार दिला आहे . न्यायालयाने आरोपीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाचा रत्नागिरी जिल्हा प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याने नीलिमाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. नीलिमाचा घातपात नसून आत्महत्याच असल्याचं तपासात समोर आलंय.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरी जिल्हा प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाडला दापोली सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला असून 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणातील तपास सुरूच असून नीलिमाने निराशेतून आत्महत्या केली असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस तपास पोहोचला आहे.

परंतु प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड यांनी कामा संदर्भात दबाव टाकून वारंवार तिचा मानसिक छळ केला असल्याचं तपास दरम्यान उघड झाल्याने संग्राम गायकवाडला पोलिसांनी अटक केली आहे. नीलिमाचे वडील सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, आपली मुलगी दापोली इथल्या ज्या बँकेत काम करत होती त्या ठिकाणी दैनंदिन कामाची माहिती संग्राम गायकवाड याला द्यावी लागत असल्याचं सांगितल आहे.

तिच्या कामात नेहेमी 15 दिवसांच टार्गेट पूर्ण करण्यासाठी तिला वारंवार सुट्टीवर असताना ही फोन येत असत असे सांगितले. दरम्यान या प्रकरणी नीलिमाचा मृत्यू ही आत्महत्या होती, घातपात झाल्याचा कोणता पुरावा मिळाला नसल्याचं पोलिसांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. तिच्या व्हीसेरा अहवालात देखील कोणत्याही प्रकारचं विष दिसून आलं नाही अस नमूद केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *