Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : हातखंबा येथे कंटेनरची ट्रकला मागून जोरदार धडक

banner 468x60

मुंबई -गोवा महामार्गावर हातखंबा गाव येथे दर्ग्याजवळील उतारावर आज सकाळी आठ वाजता एका कंटेनरने ट्रकला मागून जोरदार धडक दिली

.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

सुदैवाने त्यात कोणी जखमी नाही, मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कंटेनर चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताबाबतची माहिती अशी- हा कंटेनर गोवा ते मुंबई व पुढे उत्तर प्रदेशला चालला होता.

त्याच्यावर चालक अमरचंद महावीरप्रसाद जाट (33) रा. राजस्थान, चुरू होता. हातखंबा येथील दर्ग्याजवळ त्याचा वाहनवरील ताबा सुटला. त्यामुळे तो पुढे चाललेल्या ट्रकवर मागून आदळला. ट्रकचा चालक सुरेंद्र सरदार सिंग, (वय 45, रा. होशियारपूर पंजाब) हा होता.

अपघातातील दोन्ही चालकांना कसलीही दुखापत झालेली नाही. नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली होती.

वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अंमलदार अपघातस्थळी होते. दोन्ही वाहने क्रेनच्या मदतीने हलवण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. महामार्ग पोलीस केंद्र हातखंबाचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल बोंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *