नीलिमा चव्हाण हिने यूट्यूब सोशल मीडियावर केलेल्या सर्चिंगची मोठी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यामध्ये तिने नैराश्यातूनच जीवन संपवण्याचा मार्ग, काय केल्याने जीवावर बेतू शकते, जीवनात यशस्वी होण्याची कला अशा स्वरूपाचं काही सर्चींग केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
२२ जुलैपासून तिने हे सर्चिंग केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. नीलिमा चव्हाण यांचा मोबाईल व बॅग जगबुडी नदीत चार ते पाच दिवस पोलिसांनी सर्च ऑपरेशन करूनही या दोन्ही वस्तू मिळाल्या नाहीत.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
गुगल अकाउंटवरून पोलीस तपासात ही मोठी माहिती समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. त्यातून तिची मानसिक नैराश्याची टोकाची स्थिती लक्षात यावी आणि ती कोणत्यातरी दबावाखाली होती त्यामुळेच तिने अशा स्वरूपाचे सर्चिंग केले असावे हा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. त्यामुळे नीलिमा चव्हाण हिचा झालेला मृत्यू हा तिच्या मानसिक नैराश्यातूनच टोकाचं पाऊल उचलले असल्याने झाला अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
याप्रकरणी आत्महत्या करण्यास चिथावणी दिल्याचा गुन्हा स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यावर दाखल झाला आहे. स्टेट बँकेच्या दापोली शाखेत काम करत असताना तिच्यावर असलेला कामाचा मोठा दबाव यामधूनच आपल्या नोकरीवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते, या टेन्शनमध्ये ती असावी अशा प्राथमिक निष्कर्षाप्रत पोलीस तपास आला आहे.
दापोली शहरात अन्य स्पर्धक बँकांच्याही शाखा व अन्य पर्याय ऊपलब्ध असताना दररोज चार ते पाच डिमॅट अकाऊंट नव्याने ओपन होणे हे तसे सोपे नाही. स्टेट बँकेचा अधिकारी गायकवाड याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. नीलिमा चव्हाण मृत्युप्रकरणात संशयित आरोपी असलेल्या संग्राम गायकवाड याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती.
मात्र, न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी दिली आहे. आज शनिवारी पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात गायकवाड याच्याबरोबर आणखी कोणी या प्रकरणात अटक होण्याची शक्यता तूर्तास तपासातील मिळालेल्या माहितीवरून वाटत नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
मात्र, आता पोलीस कोठडीत असलेल्या गायकवाड याच्याकडून कोणती माहिती पोलीस तपासात समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, या प्रकरणात नीलिमा काम करत असलेल्या स्टेट बँकेतील अधिकारीच दबाव टाकत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले अशी तक्रार तिच्या वडिलांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*