चिपळूण तालुक्यातील रावळगाव-शिंदेवाडी येथे २१ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २७ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. आसावरी महेंद्र शिंदे असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आसावरी शिंदे ही रावळगाव शिंदेवाडी येथील रहिवासी होती. २७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान तिने राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या चाळीतील खोलीत गळफास घेतल्याचे समोर आले.
ही बाब लक्षात आल्यानंतर नातेवाइकांनी तिला तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७१/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
आसावरीच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











