Breaking News
चिपळूण : 21 वर्षीय तरुणीची राहत्या घरी आत्महत्या, परिसरात हळहळ दापोली : मोबाईल अपडेटच्या मेसेजवर क्लिक करणे पडले महागात, दापोलीतील नोकरदाराला 2 लाख 34 हजारांचा गंडा, सायबर भामट्यांचा नवा डाव, बनावट सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून बँक खात्यावर डल्ला रत्नागिरी : कारवांचीवाडीत गादी कारखाना आगीत खाक, सहा लाखांचे नुकसान, बाजूच्‍या जनरल स्टोअर्स दुकानालाही आगीचा फटका दाभोळमध्ये आंबा बागेतील पाण्याच्या खड्ड्यात आढळली मगर, वनविभागाकडून सुरक्षित रेस्क्यू रत्नागिरी : जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम, 30 नोव्हेंबरपर्यंत जनजागृतीचे विविध उपक्रम, बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सरसावले, शाळा, महाविद्यालये आणि गावागावांत जनजागृती

रत्नागिरी : कारवांचीवाडीत गादी कारखाना आगीत खाक, सहा लाखांचे नुकसान, बाजूच्‍या जनरल स्टोअर्स दुकानालाही आगीचा फटका

fire isolated over black background

banner 468x60

रत्‍नागिरी शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील नुरानी गादी कारखाना व त्‍याच्या बाजूचे आर्य जनरल स्टोअर्स दुकानाला अचानकपणे आग लागून सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २.३० वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.

याबाबत अकबर मोहम्मद नदाब (४९, रा. खेडशी, रत्‍नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्‍यानुसार, त्‍यांच्या कारवांचीवाडी येथील नुरानी गादी कारखान्याला बुधवारी मध्यरात्री आग लागली. यात २५० नग गादी, २५० नग उशी, ८ लोखंडी रॅक, ४ प्लास्टिक खुर्च्या, १ शिलाई मशिन, शटर, कारखान्याच्या छताचे पत्रे, विजेच्या वायर, २ फॅन, गादीचे चेक्स असलेले ६०० मीटर कापड असे अंदाजे ३ लाख ५० हजारांचे नुकसान झाले.

या गादी कारखान्याची आग बाजूच्या आर्य जनरल स्टोअर्स या दुकानात पसरल्यामुळे त्‍या दुकानातील फर्निचर, काऊंटर, विजेच्या वायर, तसेच दुकानातील माल जळून दुकान मालक आर्य पुसाळकर यांचे दोन लाख ५० हजारांचे नुकसान झाले. या दोन्ही दुकानांचे एकूण सहा लाखांचे नुकसान झाले. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी गुरुवारी सायंकाळी पंचनामा केला. या घटनेची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तपास पोलिस हवालदार प्रवीण पाटील करत आहेत.