Breaking News
चिपळूण : 21 वर्षीय तरुणीची राहत्या घरी आत्महत्या, परिसरात हळहळ दापोली : मोबाईल अपडेटच्या मेसेजवर क्लिक करणे पडले महागात, दापोलीतील नोकरदाराला 2 लाख 34 हजारांचा गंडा, सायबर भामट्यांचा नवा डाव, बनावट सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून बँक खात्यावर डल्ला रत्नागिरी : कारवांचीवाडीत गादी कारखाना आगीत खाक, सहा लाखांचे नुकसान, बाजूच्‍या जनरल स्टोअर्स दुकानालाही आगीचा फटका दाभोळमध्ये आंबा बागेतील पाण्याच्या खड्ड्यात आढळली मगर, वनविभागाकडून सुरक्षित रेस्क्यू रत्नागिरी : जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम, 30 नोव्हेंबरपर्यंत जनजागृतीचे विविध उपक्रम, बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सरसावले, शाळा, महाविद्यालये आणि गावागावांत जनजागृती

दाभोळमध्ये आंबा बागेतील पाण्याच्या खड्ड्यात आढळली मगर, वनविभागाकडून सुरक्षित रेस्क्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील दाभोळ येथे आंबा बागेतील पाण्याच्या खड्ड्यात मगर आढळून आल्याने परिसरात चर्चा सुरू झाली होती. दाभोळ-दापोली मार्गावरील घाणीचा वाकण परिसरात ही मगर आढळली. ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मगरीला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी मौजे दाभोळ येथील ग्रामस्थ केतन मोरे यांच्या आंबा बागेतील पाण्याच्या खड्ड्यात मगरीचे पिल्लू आढळून आले. याबाबत त्यांनी वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, सुमारे दीड मीटर लांबीची मादी मगर असल्याचे निदर्शनास आले.


वनविभागाच्या पथकाने संबंधित मगरीला सुरक्षित पिंजऱ्यात ताब्यात घेतले. त्यानंतर तिला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
ही रेस्क्यू मोहीम वनपाल दापोली रामदास खोत आणि वनरक्षक विश्वंभर झाडे, परेश वाडकर यांनी पार पाडली. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) प्रादेशिक गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि वनक्षेत्रपाल दापोली आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, दापोली तालुक्यात वन्यजीव लोकवस्तीत आढळल्यास, जखमी अवस्थेत निदर्शनास आल्यास नागरिकांनी स्वतःहून त्यांना हाताळण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

वनविभागाशी संपर्कासाठी :
हॅलो फॉरेस्ट : १९२६
वनक्षेत्रपाल दापोली आर. आर. पाटील : ९८३४७७४६३८