दापोली पोलिस स्थानकाच्या हद्दीतील सोंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासीवाडी येथे छापा टाकून खवलेमांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका वृद्धाला अटक केली आहे.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
ही कारवाई रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखा आणिदापोली वन विभागाने १० ऑगस्ट राेजी दुपारी १:४० वाजता केली. बाळा गणपत लोंढे (८२, रा. कोर्टीवाडी, पालगड, ता. दापोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सोंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासी वाडी येथे एक जण खवले मांजराच्याखवल्यांची विक्री करिता वाहतूक करणार आहे, अशी विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे रत्नागिरीच्यादहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील व पथकाने वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतरदापोली वन विभागाचे वन रक्षक गणपती महादेव जळणे यांना सोबत घेऊन छापा टाकला.
या छाप्यामध्ये बाळा गणपत लोंढे हासोंडेघर ते मंडणगड जाणाऱ्या मार्गावरील पालगड येथील शिरखल आदिवासी फाटा येथे वन्यजीव खवले मांजराची खवलेतस्करीच्या उद्देशाने, बेकायदेशीरपणे स्वत:च्या ताब्यात बाळगून त्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करताना आढळला.
याकारवाईत ११.६७८ किलो ग्रॅम वजनाची खवले जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिसनिरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस हवालदार राजेश भुजबळराव, उदय चांदणे, लक्ष्मण कोकरे, महेश गुरव, आशिष शेलार, सुरक्षा शाखेचे सहायक पोलिस फौजदार प्रशांत बोरकर, पोलिस हवालदार ओंकार सावंत, वन रक्षक गणपतीजळणे यांनी केली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















