गुहागर-चिपळूण मार्गावरील घोणसरे चिवेली फाट्यावर एसटी बसमधून उतरताना एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. बसमधून उतरत असताना महिलेच्या पायावरून बसचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला गुहागर तालुक्यातील रहिवासी असून, आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी रुग्णालयात जात होती. यासाठी तिने सकाळी आठ वाजता गुहागर आगारातून सुटणाऱ्या गुहागर-रत्नागिरी एसटी बसने प्रवास सुरू केला होता.
घोणसरे चिवेली फाट्यावर बसमधून खाली उतरत असताना महिलेचा पदर बसच्या दरवाजात अडकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी बसचे चाक महिलेच्या पायावरून गेल्याने तिला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला तातडीने मदत केली. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेच्या नेमक्या कारणाबाबत अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













