खेड शहरातील शिवाजीनगर परिसरात टेलिफोन एक्सचेंजसमोर एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. २९ ऑक्टोबर रोजी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० वर्षे असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यानंतर ते २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्यापूर्वीच्या कालावधीत ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मृत्यूची नेमकी तारीख आणि वेळ अद्याप स्पष्ट झालेली नाही.
शिवाजीनगर येथील रहिवासी रुपेश काशीराम पवार यांना त्यांच्या घराजवळ कुजल्याचा उग्र वास येत होता. त्यामुळे त्यांनी घराबाहेर येऊन नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने परिसरात शोध घेतला. यावेळी घराशेजारी एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नोंद घेतली. याप्रकरणी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीची ओळख पटविणे आणि मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













