चिपळूण : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणातील व्हिसेरा अहवाल पोलिसांना प्राप्त

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिचा घातपात नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली असतानाच आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे.

banner 728x90

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी (Neelima Chavan Death Case) घातपात झाल्याबाबतचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे पोलिस यंत्रणेने स्पष्ट केले आहे;

परंतु हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर आहे.नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी पोलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा होती.

हा अहवाल शुक्रवारी (११ ऑगस्ट) पोलिसांना प्राप्त झाला. या अहवालानुसार तिच्या शरीरात कोणतेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दापोली येथील एका बँकेत कामाला असणारी नीलिमा ओमळी येथील गावी जाण्यासाठी २९ जुलै रोजी निघाली होती.

मात्र, तिचा १ ऑगस्ट रोजी दाभोळ खाडीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर तिच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्राथमिक तपासानुसार तिचा घातपात नसल्याचे स्पष्ट केले होते.

तपासात त्यांनी १०४ साक्षीदारही तपासल्याचे सांगितले होते. त्याचवेळी व्हिसेरा अहवालानुसार सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे पोलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा होती. हा अहवाल तातडीने मिळावा, अशी विनंतीही पोलिसांनी केली होती.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *