ऐरोली (नवी मुंबई) येथे मारहाण झालेल्या संगमेश्वर तालुक्यातील ५२ वर्षीय व्यक्तीचा रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अनिल तुकाराम गोरे (वय ५२, रा. करंजारी, धनगरवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल गोरे यांना ऐरोली (नवी मुंबई) येथे मारहाण झाली होती. या मारहाणीबाबत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोरे यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांचे नातेवाईक गंगाराम तुकाराम गोरे यांनी त्यांना देखभालीसाठी करंजारी येथे आणले होते.
दरम्यान, अनिल गोरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ३.०७ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी अक्षय माहोकर यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.०४ वाजता देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४५/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.
ऐरोली येथे झालेली मारहाण आणि त्यानंतर झालेला मृत्यू यांचा परस्पर संबंध आहे का, याबाबत उपलब्ध माहितीच्या आधारे निष्कर्ष काढता येत नाही. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













