Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथे पतीसोबत झालेल्या घरगुती वादातून उंदीर मारण्याचे औषध प्राशन केलेल्या ३१ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मधुरा मनोज मेस्त्री असे मृत महिलेचे नाव असून, मुंबई येथील नायर रुग्णालयात उपचार सुरू असताना १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४.४५ वाजता तिची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, मधुरा मेस्त्री यांनी ४ ऑक्टोबर २०२६ रोजी शिवार आंबेरे येथील राहत्या घरी पतीसोबत झालेल्या घरगुती वादातून उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

प्रकृतीच्या पुढील उपचारांसाठी ८ ऑक्टोबर रोजी त्यांना मुंबईतील नायर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना १० ऑक्टोबर रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

या प्रकरणाची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ३९/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.३४ वाजता या घटनेची नोंद करण्यात आली.

या घटनेमुळे शिवार आंबेरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *