रत्नागिरी : हातखंबा येथे अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील सांबर टाके परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हातखंबा गावातील सांबर टाके येथे प्रकाश गुरव यांच्या मालकीच्या जागेतील मोकळ्या कातळ जमिनीवर सुमारे ५० वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याचे नाव व गाव याबाबत माहिती समजू शकलेली नाही. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे.

या व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासह मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपासाची आवश्यकता आहे.

या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ९७/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *