दापोली : 14 ऑक्टोबरला ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’, महिला कर्तृत्वाचा होणार गौरवश्रेया योगेश कदम, नगराध्यक्ष कृपा घाग आणि दाभोळच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांची प्रमुख उपस्थिती

banner 468x60

दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या महिला विभागातर्फे महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी ‘नवदुर्गा सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, 14 ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत जालगाव येथील श्री प्रीतिवर्धन मंगल कार्यालयात हा सोहळा पार पडणार आहे.


या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या श्रेया योगेश कदम, दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग आणि दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


महिलांच्या कार्याचा सन्मान आणि त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासह सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.


या सोहळ्याला दापोली तालुक्यातील सर्व व्यापारी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा कविता मालू, सचिव अस्मिता परांजपे, संघटनेचे अध्यक्ष विनोद आवळे आणि सचिव मिलिंद शेठ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *