ओमळी (ता. चिपळूण) येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे गूढ अद्यापही उकललेले नाही. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत असून, मृत्यू होण्यापूर्वी ती ज्या जोडप्याला भेटली त्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
त्यानंतर पोलिसांनी या जोडप्याची चौकशी केली आहे. मात्र, या जोडप्याचा काहीच संबंध नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलीस तिचा मोबाइल व पर्सचा शोध घेत आहेत. जिल्हा पोलीस तपास यंत्रणा सगळ्या बाजूने तपास करत आहेत. तर या विषयावरून जिल्हाभरातून विविध सामाजिक संस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दापोलीत कंत्राटी कर्मचारी असलेली नीलिमा चव्हाण सलग दोन दिवस सुटी असल्याने २९ जुलै रोजी चिपळूण येथील घरी निघाली होती. खेड येथे चिपळूण बसमध्ये ती बसली, मात्र ती घरी पोहोचली नाही. मात्र, त्यानंतर १ ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह दाभोळ खाडीत आढळता आणि एकच खळबळ उडाली.
तिच्या मृतदेहाच्या डोक्यावरील केस नसल्याने तिचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तिच्या नातेवाइकांनी याबाबत पोलिस स्थानकात फिर्याद फिर्याद दिल्यानंत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. मात्र अद्याप त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
दरम्यान, ती खेड स्थानकावर एक जोडप्याला भेटल्याचे सीसीटीव्हीचे फुटेज व्हायरल झाले आहे. य फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्य जोडप्याची चौकशी केली. तसेच त्यांच्याकडून काही माहितीही घेतल्याचे समजते.
मात्र, या जोडप्याचा नीलिमा तिथून निघून गेल्यानंतर काही संबंध नसल्याचे पुढे आले आहे. जगबुडी नदीत शोध मोहीम
दरम्यान मृत्यूपूर्वी नीलिमा हिचे शेवटचे लोकेशन खेडमधील कोडिवली धरणाजवळ दाखवत होते.
तसेच, तिचा मोबाइल व पर्स अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी खेडमधील जगबुडी नदी व बहिरवली खाड़ी परिसरात पोलिसांनी बोटीच्या साहाय्याने तपास सुरू आहे.
नीलिमा चव्हाण हिची बॅग व मोबाईल या दोन वस्तूंचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी खेड येथील जगबुडी नदी परिसरात दोन बोटी व ५० ते ६० कर्मचान्यांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त केले आहे.
याचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. नीलिमा चव्हाण ही जगबुड़ी नदीच्या जुन्या बंद असलेल्या पुलाकडे चालत गेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यानंतर निलिमांचे नेमके काय झालं याचे गुढ अद्याप कायम आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*
Response (1)