चिपळूणमध्ये पत्नीवर काठीने हल्ला, पतीविरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील ड्युटी संपवून घरी जात असलेल्या पत्नीला पतीने हेल्मेट घालून येत काठीने मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील सती येथे घडली. या मारहाणीत महिलेच्या डोक्यासह हात आणि पायाला दुखापत झाली असून, पतीविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास सती येथील चैतन्य क्लिनिकसमोर घडली. याप्रकरणी मानसी महेंद्र डांगरे (वय ४५, रा. सती, सहारा बिल्डिंग, चिपळूण) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, मानसी डांगरे या चैतन्य क्लिनिक, सती येथे ड्युटीवर होत्या. ड्युटी संपल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी क्लिनिकच्या दरवाजासमोर आल्या असता त्यांचे पती महेंद्र हरिश्चंद्र डांगरे (वय ५५, रा. पोफळी, ता. चिपळूण) हे हेल्मेट घालून तेथे आले.

त्यानंतर त्यांनी काठीने मानसी यांच्या डोक्यात, उजव्या हातावर तसेच डाव्या पायाच्या मांडीवर मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारहाणीत त्या जखमी झाल्या.

घटनेनंतर २४ सप्टेंबर रोजी पहाटे १.५२ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी महेंद्र डांगरे यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेतील जखमी मानसी डांगरे यांच्यावर उपचार करण्यात आले असून, पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *