चिपळूण येथे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सावर्डा धबधब्याजवळील धोकादायक वळणावर भरधाव ट्रेलर पलटी होऊन झालेल्या अपघातात राजस्थानमधील २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशन रतन सिंह (वय २९, रा. गोहाना, अजमेर, राजस्थान) हा ट्रेलर घेऊन उत्तर प्रदेश ते जयगड, रत्नागिरी असा प्रवास करीत होता. परशुराम घाटातील सावर्डा धबधब्याजवळील वळण आणि उतार धोकादायक असल्याची माहिती असतानाही वाहन वेगाने चालविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे.
घाटातील वळणावर ट्रेलरवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाले. या अपघातात किशन रतन सिंह याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













