राजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात १० व ११ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर, रत्नागिरीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत ५ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ८ पदके पटकावली. या दमदार कामगिरीच्या जोरावर रत्नागिरी तालुक्याने द्वितीय क्रमांकाचा मान मिळवला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, रत्नागिरी यांच्या मान्यतेने रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, राजापूर तालुका शारीरिक शिक्षण संघटना तसेच राजापूर तालुका तायक्वांदो अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतला.
स्पर्धेत आयान मुश्ताक खान, उपर्जना राम कररा, अमेय भरत पाटील, सई संदेश सुवारे आणि भार्गवी सत्यविजय पवार यांनी सुवर्णपदके मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली. तसेच दिव्या विलास गुरव, उमर अलजी आणि कौस्तुभ वालम यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत पदकांची कमाई केली.
या यशस्वी संघाला महिला प्रशिक्षक शशी रेखा कररा यांचे मार्गदर्शन लाभले, तर प्रशिक्षक राम कररा यांनी खेळाडूंना मोलाचे प्रशिक्षण दिले.
या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सर्व पदक विजेत्या खेळाडूंची तळसंदे, हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खेळाडूंच्या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, क्रीडा अधिकारी गणेश जगताप तसेच रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश्वर राव कररा यांनी विजेत्या खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













