‘मिशन फिनिक्स’अंतर्गत अंमली पदार्थांच्या विरोधात रत्नागिरी पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना रेल्वे स्टेशन परिसरात एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला गांजा जप्त करण्यात आला.
चिपळूण रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस गस्त घालत असताना पोलिसांना एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी करून झडती घेतली असता त्याच्या ताब्यात विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेला गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह संबंधित वाहन असा एकूण १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांकडून ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत विशेष मोहीम राबवली जात आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि त्यांच्या पथकाने केली. अंमली पदार्थांविरोधातील या कारवाईमुळे चिपळूण परिसरातील अंमली पदार्थांच्या गैरप्रकारांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













