दापोली : आझाद मैदानात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, दोघांविरोधात दापोली पोलिसांत गुन्हे दाखल

banner 468x60

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघांविरोधात दापोली पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार कारवाई केली आहे. आझाद मैदान परिसरात दोन वेगवेगळ्या वेळेस ही कारवाई करण्यात आली.

पहिल्या प्रकरणात, ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अक्षय अप्लेश देवळे (वय २४, रा. वाकवली कोंडवाडी, ता. दापोली) हा आझाद मैदान येथे उघड्या जागेत सार्वजनिक ठिकाणी मॅजिक मुव्हमेंट जामुन विदेशी मद्याची बाटली घेऊन मद्यपान करताना आढळून आला. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९६/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या प्रकरणात, त्याच दिवशी रात्री ८.५० वाजण्याच्या सुमारास जुबेर हुसेनमियाँ मुकादम (वय ४०, रा. फॅमिलीमाळ, आराईचाळ, दापोली) हा आझाद मैदान परिसरात उघड्या जागेत सार्वजनिक ठिकाणी लंडन पिल्सनर बिअरचा टिन घेऊन मद्यपान करताना पोलिसांना आढळून आला.

याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही प्रकरणांत पोलीस कॉन्स्टेबल धनाजी भास्कर देवकुळे यांनी फिर्याद दिली असून, दापोली पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *