चिपळूणमध्ये मद्यप्राशन करून कार चालविणाऱ्या तरुणावर कारवाई

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत चारचाकी वाहन चालविणाऱ्या तरुणावर चिपळूण पोलिसांनी कारवाई करत मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई ५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील पाग पॉवर हाऊससमोर करण्यात आली. आरोपी हा आपल्या ताब्यातील गोल्डन रंगाची फोक्सवॅगन कंपनीची व्हेंटो चारचाकी (एमएच ०१ सीटी ११३३) मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत चालवित असताना पोलिसांना आढळून आला.

याप्रकरणी पोलीस हवालदार प्रितेश प्रकाश शिंदे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जहीर रियाज घारे (वय २४, मूळ रा. निगुंडळ, मुस्लिम मोहल्ला, ता. गुहागर, जि. रत्नागिरी; सध्या रा. श्रृंगारतळी बाजारपेठ, ता. चिपळूण) याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यातील कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची नोंद ६ सप्टेंबर रोजी पहाटे १.५० वाजता करण्यात आली असून, चिपळूण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *