रत्नागिरी : मणक्याच्या आजाराला कंटाळून वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील राई-खापरेवाडी येथील वृद्धाने मणक्याच्या आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. वासुदेव भागा खापरे (वय ६७, रा. राई खापरेवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २९) सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास घडली.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध वासुदेव खापरे हे गेली पाच वर्षापासून मणक्याच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर जाकादेवी येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी या आजाराला कंटाळून त्यांनी सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास राहात्या घराच्या खोलीतील लाकडी वाशाला सुती दोरी बांधून गळफास घेतला. तात्काळ त्यांना शनिवारी सकाळी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *