दाभोळ : बसस्थानक परिसरात बेकायदा मटका जुगाराचा पर्दाफाश, एकावर गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यातील दाभोळ धक्का परिसरातील बसस्थानकाजवळ बंद पानटपरीच्या बाजूला बेकायदा मुंबई मटका जुगार खेळविताना एका व्यक्तीला दाभोळ सागरी पोलिसांनी पकडले. ही कारवाई २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास दाभोळ धक्का येथील बसस्थानक परिसरात एका बंद पानटपरीच्या बाजूला मुंबई मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे कारवाई केली.

या कारवाईदरम्यान संजय राजाराम मोरे (वय ६०, रा. भिवबंदर, पो. वणौशी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) हा कोणताही परवाना नसताना बेकायदा मुंबई मटका जुगार खेळविताना मिळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ६४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ६४० रुपये रोख रक्कम, ५ रुपये किमतीचा बॉलपेन तसेच जुगाराचे इतर साहित्य यांचा समावेश आहे.

या प्रकरणी दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी सागर बाळासो कांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली. गुन्हा २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.५८ वाजता दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दाभोळ सागरी पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *