लांज्यात 25 वर्षीय तरुण बेपत्ता, 27 जुलैपासून शोध सुरू

banner 468x60

लांजा तालुक्यातील आगवे जोशीवाडी येथील २५ वर्षीय तरुण २७ जुलैपासून बेपत्ता झाला असून, याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.


banner 728x90

पंकज प्रकाश जोशी (वय २५, रा. आगवे जोशीवाडी) हा २७ जुलै रोजी सकाळी सुमारे ६ वाजता आई प्रियांका प्रकाश जोशी (वय ५२) यांना बाहेर जाऊन येतो, असे सांगून घरातून निघून गेला. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही.

पंकज घरी न परतल्याने त्याची आई आणि नातेवाईकांनी आजूबाजूचा परिसर तसेच नातेवाईकांकडे त्याचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर संजय विलास चव्हाण (रा. खालची कुंभारवाडी, लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात पंकज बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल जान्हवी मांजरे करीत आहेत. पंकजबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *