संगमेश्वर तालुक्यातील बावनदी रेवाळेवाडी (ता. संगमेश्वर) येथील महेश नारायण भरणकर (वय ४२) यांचा मृतदेह बेपत्ता झाल्यानंतर चौथ्या दिवशी बावनदी पुलाजवळ सुमारे ३०० मीटर अंतरावर नदीपात्रात आढळून आला.
शुक्रवारी सकाळी महेश भरणकर हे बावनदीच्या जुन्या पुलावर बसले असताना त्यांचा तोल जाऊन ते नदीत पडले होते. घटनेनंतर पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून सलग चार दिवस शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर सोमवारी त्यांचा मृतदेह पुलापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर नदीपात्रात आढळला.
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितीश केणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, स्थानिक पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने नदीपात्र आणि परिसरात सातत्याने शोधकार्य सुरू होते. या संयुक्त प्रयत्नांमुळे चौथ्या दिवशी मृतदेहाचा शोध लागला.
या दुर्दैवी घटनेमुळे बावनदी परिसरात हळहळ व्यक्त होत असून महेश भरणकर यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













