Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

मंडणगड : युवासेनेच्या वतीने मंडणगड तालुक्यातील शाळांमध्ये मोफत दफ्तर वाटप

banner 468x60

राज्याचे माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यमंत्री योगेश कदम व श्रेया कदम यांच्या प्रेरणेने मंडणगड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत शालेय दफ्तरांचे वाटप करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच पालकांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शिवसेना तालुका अध्यक्ष प्रताप घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाभर हा उपक्रम सुरू असून, नुकतेच नियुक्त झालेले युवासेना तालुका अध्यक्ष विकास पवार गावोगावी जाऊन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दफ्तरांचे वितरण करत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील १०० हून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये दफ्तरांचे वाटप पूर्ण झाले असून, उर्वरित शाळांमधील वाटपही आठवडाभरात पूर्ण होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. शालेय साहित्याची गरज असलेल्या विद्यार्थ्यांना नवीन दफ्तर उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शिक्षणाबाबत आत्मविश्वास निर्माण करणे, शिक्षणाची आवड वाढविणे आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे युवासेना तालुका अध्यक्ष विकास पवार यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणारे असे लोकाभिमुख उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव अधिक दृढ करतात. या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी स्वागत केले असून, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याची भावना विकास पवार यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *