Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

गुहागर : मुलासोबत कौटुंबिक वादातून वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

गुहागर तालुक्यातील वेळंब गुरववाडी येथे कौटुंबिक वादाच्या मानसिक तणावातून एका ५२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराच्या पाठीमागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मधुकर तांबे (वय ५२, रा. वेळंब गुरववाडी, ता. गुहागर) हे आपल्या कुटुंबासह राहत होते. मंगळवारी (२९ जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांचा मुलगा संकेत याच्यासोबत काही कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. या वादामुळे ते मानसिक तणावात असल्याचे सांगितले जाते.

यानंतर रात्री ११ ते बुधवारी (३० जुलै) सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी घराच्या पाठीमागे असलेल्या शिवणीच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली.

या प्रकरणी त्यांचे भाऊ महेश मधुकर तांबे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ३१/२०२६ अशी नोंद केली असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी भावनिक तणाव, नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार अनुभवत असेल, तर विश्वासू कुटुंबीय, मित्र किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी तातडीने संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. मदत उपलब्ध आहे आणि वेळेवर आधार मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *