चिपळुणात भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक, उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू, अल्पवयीन चालकावर गुन्हा

banner 468x60

चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका परिसरात कराड–गुहागर महामार्गावर भरधाव दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अल्पवयीन दुचाकी चालकाविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास एस.एम.एस. बॅटरी दुकानासमोर, बहादूरशेख नाका येथील कराड–गुहागर महामार्गावर हा अपघात घडला.

अल्पवयीन चालक मंथम मिलिंद कुंभार (वय १७, रा. खेर्डी शिवाजीनगर, ता. चिपळूण) हा एमएच-०८ एजे-६४९२ क्रमांकाची दुचाकी निष्काळजी व भरधाव वेगाने चालवत असताना पादचारी भास्कर पुंजाजी कोळी (रा. मुसाड सुर्वेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात भास्कर कोळी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातात दुचाकी चालकालाही किरकोळ दुखापत झाली असून वाहनाचेही नुकसान झाले आहे.

या प्रकरणी रघुनाथ राजाराम सुर्वे (वय ३२, रा. कळंबस्ते वाशिष्ठनगर, ता. चिपळूण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२०/२०२६ नोंद करण्यात आला आहे.

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *