Breaking News
चिपळूण : स्प्रिंग क्लिनिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘पिको’ व ‘डायोड लेझर’ तंत्रज्ञानाचा शुभारंभत्वचारुग्णांना आता जागतिक दर्जाचे लेझर उपचार स्थानिक पातळीवर आणि स्थानिक शुल्कात उपलब्ध दापोली : डॉ. प्रशांत परांजपे यांना २०२६ चा ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’, पर्यावरण आणि सामाजिक कार्याचा सन्मान चिपळूण : गैरहजेरीचे कारण लेखी दिल्यानंतरही १२ वीच्या विद्यार्थ्याला तासभर कॉलेजमध्ये डांबल्याचा आरोप, पालकांकडून शिक्षकांच्या निलंबनाची मागणी राजापूर : घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 28 वर्षीय नराधमाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल रत्नागिरी : एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; 34 एटीएम कार्डे जप्त, आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश

चिपळूण : स्प्रिंग क्लिनिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘पिको’ व ‘डायोड लेझर’ तंत्रज्ञानाचा शुभारंभत्वचारुग्णांना आता जागतिक दर्जाचे लेझर उपचार स्थानिक पातळीवर आणि स्थानिक शुल्कात उपलब्ध

banner 468x60

चिपळूण : त्वचाविकार आणि सौंदर्यशास्त्र क्षेत्रात चिपळूणमधील स्प्रिंग स्किन अँड कॉस्मेटोलॉजी क्लिनिकने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त अत्याधुनिक पिको लेझर आणि डायोड लेझर प्रणालीचा शुभारंभ केला आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कोकणातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या लेझर उपचारांचा लाभ आता चिपळूणमध्येच, स्थानिक शुल्कामध्ये उपलब्ध होणार आहे.

banner 728x90

क्लिनिकमध्ये सुरू करण्यात आलेल्या या दोन्ही वैद्यकीय लेझर प्रणालींना डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसेस, यू.एस.ए. या जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त संस्थेचे प्राधिकरण मिळाले असून, त्यामुळे उपचारांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेचा उच्च दर्जा रुग्णांना मिळणार आहे.

अत्याधुनिक डायोड लेझर प्रणालीद्वारे चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी कमी करण्यासाठी प्रभावी आणि तुलनेने वेदनारहित उपचार उपलब्ध होणार आहेत. विशेषतः हार्मोन्सच्या असंतुलनामुळे चेहरा किंवा शरीरावर जास्त प्रमाणात केस येण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या महिलांसाठी ही उपचारपद्धती उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे केवळ सौंदर्यवृद्धीच नव्हे, तर आत्मविश्वास वाढविण्यासही मदत होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

याशिवाय, पिको लेझर प्रणालीच्या माध्यमातून जन्मखुणा, वांग, अपघातानंतर राहिलेले व्रण, नको असलेले टॅटू (गोंदण), त्वचेवरील पिगमेंटेशन तसेच विविध त्वचारोग आणि सौंदर्यविषयक समस्यांवर आधुनिक, प्रभावी आणि वेदनारहित उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या सुविधेमुळे कोकणातील रुग्णांना उपचारासाठी मुंबई, पुणे किंवा इतर महानगरांमध्ये जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान स्थानिक स्तरावर उपलब्ध झाल्याने वेळ, खर्च आणि प्रवासाचा त्रासही वाचणार आहे.

‘ग्लोबल टेक्नॉलॉजी ॲट लोकल कॉस्ट’ या संकल्पनेवर आधारित रुग्णहिताचा ध्यास घेत स्प्रिंग स्किन अँड कॉस्मेटोलॉजी क्लिनिकने आधुनिक वैद्यकीय लेझर उपचारांची नवी दिशा कोकणातील नागरिकांसाठी खुली केली आहे. या नव्या सुविधेचे विविध मान्यवरांनी स्वागत करत, आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत व्यक्त केले.

अधिक माहितीसाठी :
स्प्रिंग स्किन अँड कॉस्मेटोलॉजी क्लिनिक, स्वरविहार गृहसंकुल, जेड गार्डन, पिंपळ गणेश मंदिराजवळ, चिपळूण.

दूरध्वनी : (02355) 261234 / 260677
मोबाईल : 9730906216 / 7998494949 / 9673956514 / 7588477690

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *