रत्नागिरी जिल्ह्यातील सुपुत्र भावेश सुरेश चव्हाण याने Re-NEET UG 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ST प्रवर्गात महाराष्ट्रात प्रथम तर देशात चौथा क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) मार्फत २१ जून २०२६ रोजी घेण्यात आलेल्या Re-NEET UG 2026 परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला. या परीक्षेत लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या भावेशने ६६६ गुण मिळवत ऑल इंडिया रँक (AIR) 650 प्राप्त केली. या निकालाच्या आधारे त्याने ST प्रवर्गात राज्यात प्रथम आणि देशात चौथा क्रमांक पटकावला आहे.
महाविद्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा Re-NEET परीक्षेसाठी २०३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले असून, भावेश चव्हाणच्या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













