Breaking News
दापोली : स्वयं-सहाय्यता बचत गटांतील महिला होणार उद्योजिका, ‘कृषी संगिनी’ समूहाकडून यशस्वी मार्गदर्शन खेड : लोटे एमआयडीसीत रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ संतप्त, संबंधित कारखान्यावर कठोर कारवाईची मागणी दापोली : शिवाजीनगर-भौंजाळी जिल्हा परिषद शाळेला ‘आदर्श शाळा पुरस्कार’; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरव दापोली : साखळोली नं. 2 येथे कृषी संगिनींचा पुढाकार; ग्रामस्थांच्या सहभागातून तयार केला गावाचा सर्वसमावेशक नकाशा गुहागर : मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्याकडून जानवळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

दाभोळ : धांतोंडी वाडीत ‘कृषी सखी’ गटाकडून सुरक्षित कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक, शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन

banner 468x60

प्रतिनिधी- सागर गोवळे, ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत धांतोंडी वाडी, वणोशी तर्फे पांचनदी येथे ‘कृषी सखी’ गटाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कीटकनाशके व बुरशीनाशकांची सुरक्षित हाताळणी तसेच फवारणी उपकरणांच्या योग्य देखभालीबाबत विशेष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

banner 728x90

या प्रात्यक्षिकात कृषी सखी गटातील शबरी चव्हाण, संजना जंगले, मधुजा घडशी, पायल मोरे, रिंकू बाजीया, तरला श्रीदेवी, दिविलीयू, देवीप्रिया पी. टी., श्रीलया एम., मुस्कान कसोटीया आणि नित्या राज या विद्यार्थीनींनी सहभाग घेत शेतकऱ्यांना सुरक्षित व शास्त्रोक्त पद्धतीने पीक संरक्षणाची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रासायनिक कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा वापर करताना आवश्यक ती काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. फवारणीदरम्यान वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (पीपीई किट) वापर का आवश्यक आहे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. हातमोजे, फेस मास्क, हेअर कॅप, संरक्षक कपडे आणि इतर सुरक्षा साहित्याचा योग्य वापर केल्यास रसायनांच्या दुष्परिणामांपासून आरोग्याचे संरक्षण कसे करता येते, याची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी शेतकऱ्यांना कीटकनाशकांचे द्रावण तयार करण्याची शास्त्रीय पद्धत समजावून सांगण्यात आली. औषधांच्या लेबलवरील सूचनांचे पालन करून योग्य प्रमाणात द्रावण तयार करणे, फवारणी यंत्राचा योग्य वापर करणे आणि काम पूर्ण झाल्यानंतर यंत्राची स्वच्छता व नियमित देखभाल करणे किती आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच मॅन्कोझेब, कार्बेन्डाझिम, कॉपर ऑक्सीक्लोराइड, क्लोरपायरीफॉस, इमिडाक्लोप्रिड आणि लॅम्ब्डा-सायहॅलोथ्रीन यांसारख्या पीक संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी, योग्य मात्रा आणि सुरक्षित साठवणुकीच्या पद्धतींबाबतही माहिती देण्यात आली.

योग्य पद्धतीने फवारणी केल्यास कीड व रोगांचे प्रभावी नियंत्रण होण्याबरोबरच रसायनांचा अपव्यय टाळता येतो. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो, पिकांची गुणवत्ता सुधारते, उत्पादनात वाढ होते आणि पर्यावरणाचेही संरक्षण होते, असे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आले.

धांतोंडी वाडीतील शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकात उत्साहाने सहभाग घेत विविध प्रश्न उपस्थित केले. विशेषतः सुरक्षा साहित्याचा वापर, रसायनांची सुरक्षित साठवणूक, फवारणी यंत्रांची देखभाल व दुरुस्ती याबाबत त्यांनी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पीक संरक्षणाबाबत सुरक्षित, शास्त्रोक्त आणि जबाबदार दृष्टिकोन विकसित होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *