रत्नागिरी : रेल्वे स्थानकावरील कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू, आकस्मिक मृत्यूची नोंद

banner 468x60

रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात कोकण रेल्वेचे फरशी बसविण्याचे काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

banner 728x90

मृत तरुणाचे नाव मोहम्मद मुरसलीम निजामुद्दीन (वय २२, रा. रत्नागिरी रेल्वे स्टेशन, कुवारबांच, ता. जि. रत्नागिरी) असे आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद मुरसलीम हा शाहनवाज सरवर कलिमुद्दीन यांच्यासोबत गेल्या तीन आठवड्यांपासून रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे कोकण रेल्वेच्या फरशी बसविण्याच्या कामावर कार्यरत होता. दरम्यान, त्याला ताप आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने प्रथम एका खासगी क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले.

मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आणि तो बेशुद्ध पडल्याने त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. तेथील उपचारादरम्यान प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नवी मुंबईतील एम.जी.एम. हॉस्पिटल, कामोठे येथे हलविण्यात आले.

मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

या घटनेची आकस्मिक मृत्यू क्रमांक ८५/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *