रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ अन्वये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४०/२०२६ अंतर्गत श्रीकांत चंद्रकांत पवार (वय २७, रा. नवानगर, ता. दापोली) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. १४ जुलै रोजी रात्री सुमारे ८ वाजता आझाद मैदान येथील सार्वजनिक ठिकाणी तो क्लासिक गोल्डन व्हिस्की (१८० मिली)ची बाटली घेऊन मद्यप्राशन करताना आढळून आला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अविनाश किसन करदेकर यांनी फिर्याद दिली.
याच ठिकाणी दुसऱ्या कारवाईत विजय उमेश तेरेकर (वय ३१, रा. वळणे, ता. दापोली) हा टुबर्ग स्ट्राँग बिअरचे सेवन करताना सार्वजनिक ठिकाणी आढळून आला. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शिपाई विशाल प्रकाश जगताप हे फिर्यादी आहेत.
दरम्यान, मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७९/२०२६ अंतर्गत अजीम हुसेन शेख (वय १८, रा. पेडेकर चाळ, श्रद्धा हॉस्पिटलमागे, ता. मंडणगड) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. मंडणगड बाजारपेठेतील पाट रोडवरील छकुली देशी बारसमोरील सार्वजनिक रस्त्यावर तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी वैशाली मोहन चव्हाण यांनी फिर्याद दिली असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांविरुद्ध अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













