लांजा तालुक्यातील संतोष विजय धनावडे ४२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी, १४ जुलै रोजी रात्री ७.४० वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष विजय धनावडे (वय ४२, रा. बेनी खुर्द बौद्धवाडी, ता. लांजा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मंगळवारी रात्री संतोष धनावडे हे आपल्या राहत्या घरी असताना त्यांनी घरातील लोखंडी बाराला कापडी ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेतून खाली उतरवले.
त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. वैद्यकीय तपासणीत फाशीमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













