मंडणगड तालुक्यातील सावित्री नदीवरील म्हाप्रळ-आंबेत पुलाला अडकलेल्या दोन्ही बार्ज अखेर यशस्वीरित्या हटवण्यात आल्या आहेत. संबंधित यंत्रणांच्या अथक प्रयत्नांनंतर बार्ज सुरक्षितपणे बाजूला करण्यात आल्याने पुलावरील धोका टळला आहे.
बार्ज हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुलाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पर्यायी मार्गांचा वापर करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या संपूर्ण कारवाईदरम्यान महसूल विभाग, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण तसेच अन्य संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. प्रशासनाने सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेत बार्ज हटविण्याची मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
पुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने रायगड-रत्नागिरी जिल्ह्यांमधील दळणवळण पुन्हा सुरळीत झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













