खेड तालुक्यातील दहिवली येथील भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेनंतर आता चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील गोटलवाडी येथेही संभाव्य भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. वस्तीलगतच्या डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

खेड तालुक्यातील गोटलवाडी येथे वस्तीलगत असलेल्या डोंगरामध्ये सुमारे दीड ते दोन किलोमीटरपर्यंत मोठ्या भेगा आणि तडे पडल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या भेगा अधिक रुंदावण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, कोणत्याही क्षणी दरड कोसळून वस्तीला धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

दहिवली येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याने परिसरातील नागरिक आधीच धास्तावलेले असताना गोटलवाडीतील परिस्थितीने चिंता आणखी वाढवली आहे.

ग्रामस्थांनी या गंभीर परिस्थितीची माहिती प्रशासनाला दिली असून, महसूल, भूगर्भशास्त्र आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक पाहणी करावी, संभाव्य धोका निश्चित करावा आणि आवश्यक असल्यास धोकादायक परिसरातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दहिवली दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने अशा संवेदनशील ठिकाणांची तातडीने तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













