Breaking News
मंडणगड : आंबेत खाडीतील अडकलेल्या दोन्ही बार्ज हटवण्यात यश, म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या खोदाईचा फटका, दरड कोसळली, कोळंबेतील कमळजाबाई हायस्कूलवर दरडीचे संकट, 400 विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका चिपळूण: वशिष्ठी नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची सुटका, पालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळली दुर्घटना मंडणगड-म्हाप्रळ मार्गावर शेनाळेजवळ दरड कोसळली वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल दाभोळमध्ये खळबळ – अल्पवयीन मुलीवर ढोरसईमधील नराधमाकडून अत्याचार, पीडिता 5 महिन्याची गरोदर राहिल्याने दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

चिपळूण: वशिष्ठी नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची सुटका, पालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळली दुर्घटना

banner 468x60

मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत बुधवारी सायंकाळी अचानक झालेल्या वाढीमुळे एनरॉन पूल परिसरात एका कुटुंबावर जीवघेणे संकट ओढवले. कोळकेवाडी धरणातून वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यात आल्याने नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आणि नदीकाठावरील एका घराला चारही बाजूंनी पाण्याने वेढा घातला. काही क्षणांतच घराबाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने संपूर्ण कुटुंब घरातच अडकून पडले. पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

banner 728x90

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक प्रमोद बुरटे यांनी तात्काळ चिपळूण नगरपालिकेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. संकटाची तीव्रता लक्षात घेऊन नगराध्यक्ष सकपाळ यांनी वेळ न दवडता आपत्ती व्यवस्थापन पथक, नगरपालिका कर्मचारी आणि आवश्यक सुरक्षा साहित्य घेऊन घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर पाण्याचा वेग मोठा असल्याने बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत होते. अशा परिस्थितीत नगराध्यक्ष उमेश सकपाळ, बांधकाम सभापती कपिल शिर्के, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे आणि नगरपालिका पथकाने दोरी, सुरक्षा उपकरणे आणि स्थानिकांच्या मदतीने नियोजनबद्ध पद्धतीने बचाव मोहीम सुरू केली. जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून त्यांनी अडकलेल्या कुटुंबापर्यंत पोहोचत त्यांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले.

या बचाव मोहिमेत मंगेश पेढाम्बकर, नगरसेवक प्रमोद बुरटे, बापू साडविलकर, रतन पवार, सुयोग चव्हाण, दयानंद जुवळे, निलेश किंजळकर, अजय कासारे, गोट्या मोहिते, इकबाल इरफान, सिद्धेश रेडीज, निखिल शेट्टी तसेच अनेक स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम केल्यामुळे अडकलेल्या कुटुंबाची सुखरूप सुटका करण्यात यश आले.

या धाडसी आणि वेळेवर करण्यात आलेल्या बचावकार्यानंतर उपस्थित नागरिकांनी नगराध्यक्ष, नगरपालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि बचाव मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे कौतुक केले. वेळेत मदत पोहोचल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीसह इतर नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *