रायगड : आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद

banner 468x60

पोलादपूर–महाबळेश्वर राज्य महामार्गावरील आंबेनळी घाट (SH-139) अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या वाढत्या धोक्यामुळे ३१ जुलै २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी ७ जुलै २०२६ पासून सुरू झाली आहे.

आंबेनळी घाट हा भूस्खलनप्रवण आणि अतिसंवेदनशील मार्ग असून, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता तसेच पोलादपूर तहसीलदार यांनी सादर केलेल्या अहवालानुसार घाटात दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. यापूर्वीही ३ ते ६ जुलै या कालावधीत खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता.

banner 728x90

सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घाट परिसरात अनेक ठिकाणी दरडी कोसळत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. महाडचे उपविभागीय अधिकारी यांनीही हा मार्ग बंद ठेवण्याची शिफारस केली होती.

प्रशासनाचे आवाहन :
वाहनचालकांनी आंबेनळी घाटाचा वापर करू नये तसेच प्रवासासाठी प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *