Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

गुहागर युवासेना अधिकारी इम्रान घारे यांचा पदाचा राजीनामा, कार्यकर्ता म्हणून राहणार सक्रिय

banner 468x60

गुहागर : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेचे गुहागर तालुका अधिकारी इम्रान घारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आमदार भास्कर जाधव यांच्याकडे सुपूर्द केला आहे. पक्षासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याचे कारण देत त्यांनी पदाचा राजीनामा दिला असून, पुढेही पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात स्पष्ट केले आहे.

banner 728x90

इम्रान घारे हे २०२२ पासून गुहागर तालुका युवासेना अधिकारी म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी तालुक्यात युवकांचे प्रभावी संघटन उभारण्यासाठी काम केले. स्वतःचा व्यवसाय सांभाळत पक्ष संघटनेत सक्रिय भूमिका बजावत त्यांनी अनेक युवकांना पक्षाशी जोडण्याचे काम केले.

विशेषतः आमदार भास्कर जाधव यांचे राजकीय बळ वाढवण्यासाठी युवकांची मजबूत फळी उभारण्यात इम्रान घारे यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मात्र, पदाचा राजीनामा हा केवळ वैयक्तिक कारणांमुळे आणि पक्षासाठी अपेक्षित वेळ देता येत नसल्यामुळे दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, पुढेही पद नसले तरी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करत राहणार असल्याचे त्यांनी आपल्या पत्रातून नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *