Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

खेड : पोटावर लाकूड पडून जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील फुरुस येथे मजुरीचे काम करत असताना पोटावर लाकूड पडून गंभीर जखमी झालेल्या ५८ वर्षीय मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दिनेश गणू बाईत (वय ५८, रा. संगलट, शेरवली, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश बाईत हे मजुरीच्या कामासाठी फुरुस येथे गेले होते. काम सुरू असताना त्यांच्या पोटावर अचानक लाकूड पडल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी दापोली येथील मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात (आयसीयू) त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच १२ जून २०२६ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.


या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आमृ. क्रमांक ५१/२०२६ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित नोंद २४ जून २०२६ रोजी दुपारी १२.५२ वाजता दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *