दापोली शहरातील आझाद मैदान परिसरात मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर दापोली पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.५४ वाजण्याच्या सुमारास आझाद मैदान येथील एस.टी. डेपोबाहेरील गल्लीमध्ये टपरीजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी विनोद मधुकर माटकर (वय ५०, रा. जालगाव बाजारपेठ, ता. दापोली) हा लोकांकडून पैसे स्वीकारून विनापरवाना मटका जुगाराचा खेळ चालवत असल्याचे आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी मटका जुगाराचे साहित्य तसेच १,३०० रुपये रोख रक्कम असा एकूण १,३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मधुकर सोनबा चौधरी (पो.कॉ. ९७९, दापोली पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १२९/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













