चिपळूण तालुक्यातील पोफळी परिसरात एका ५९ वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. दिपक लक्ष्मण शिंदे (वय ५९, रा. सरफारेवाडी, पोफळी) असे मृत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिपक शिंदे हे १९ जून रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास कोणालाही कोणतीही पूर्वकल्पना न देता घरातून बाहेर पडले होते. बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. त्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांचा परिसरात शोध सुरू केला.
शोधमोहीम सुरू असतानाच रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या दरम्यान पोफळी येथील पुलाजवळील जंगल परिसरात दिपक शिंदे यांचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब समोर येताच परिसरात खळबळ उडाली आणि ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणाची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, दिपक शिंदे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, २० जून रोजी या घटनेची अधिकृत नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, संबंधित सर्व बाबींची चौकशी सुरू आहे. शांत व सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या अशा आकस्मिक निधनाने सरफारेवाडी व पोफळी परिसरात शोककळा पसरली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













